logo

परमात्मा एक भवनातील दानपेटी ची चोरी*

*परमात्मा एक भवनातील दानपेटी ची चोरी*

रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावातील परमात्मा एक बहुउद्देशीय संस्थेचे आश्रमातील दानपेटी चोरी केलीचा प्रकार दिसून आले
गावापासून बाजूलाच काचूरवाही मसला- मार्गावर वरिल येथील परमात्मा भवनात ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची श्रध्दा असल्यामुळे दिवसभर येथील सेवक या मानव मंदिरात येत जात असतात.
पन काही चोरट्यांनी या मानव मंदिरात कोणी नसताना २४ एप्रिल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भवनाचे कुलूप तोडून दानपेटी भवना बाहेर काढून दानपेटी भवनात न फोडता भवना जवळील १५० मिटर अंतरावर गुलाब सोमनाथे यांच्या शेतात नेऊन दगड ईतर हत्याराने दानपेटी व कुलूप फोडली. त्यातील अंदाजे ८ ते १० हजार रुपये रक्कम त्यामध्ये जमा असल्याची माहिती होती
नेहमीप्रमाणे दररोज सकाळी पहाटे साडेपाच वाजता जितेंद्र शामू मोहनकार हे सकाळी परमात्मा भवनात नेहमीप्रमाणे विनंती करिता गेले असता त्यांना परमात्मा एक भावनाचे कुलूप फोडलेले दिसले व दानपेटी नसल्याचे दिसून आले त्यांनी येथील परमात्मा एक संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सेवकांना ही माहिती कळविली. व सकाळी आजूबाजूला बघितले असता दानपेटी ही आश्रम परिसरातील एका शेतामध्ये पडलेल्या अवस्थेत दिसली. सर्व सेवक एकत्र आले व त्यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील शुभांगी सोमनाथे यांना दिली व तात्काळ त्यांनी व सेवकांनी रामटेक पोलीस स्टेशन येथे या घटनेची तक्रार नोंद केली आहे व पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे

66
4016 views